शिवजयंती पोवाडा । मी शिवजीराजे भोसले बोलतोय ।


शिवजयंती पोवाडा, Song Lyrics. This song is from the movie मी शिवजीराजे भोसले बोलतोय starring Mahesh Manjrekar, Sachin Khedekar, Makarand Anaspure, Suchitra Bandekar, Siddarth Jadhav, Priya Bapat, Abhijeet Kelkar. This song is sung by Nandesh Umap while music is guven by Ajay, Ajit and sameer.


शिवजयंती – पोवाडा

शिवजयंती पोवाडा । मी शिवजीराजे भोसले बोलतोय । मकरंद अनासपुरे, महेश मांजरेकर ।


महाराजांची, शिवाजी महाराजांची किर्ती बेफाम होती,
महाराजांची किर्ती बेफाम होती,
भल्या भल्यांना फुटलाय घाम,
याला कोन घालिल येसन,
दरबारी पुसती बेगम,

बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर…का,

नजरेत तिच्या अंगार
दरबार झाला गपगार,
कुणी घेइना पुढाकार
सारयानीच मानली हार,

इतक्यात अचानक एक सरदार उठला…बोलला…
“हम लायेंगे शिवाजी को…अन त्याने विडा उचलला”
नाव त्याच अफजल खान…नाव त्याच अफजल खान…
नाव त्याच अफजल खान  जिता जागता जणू सैतान

खान बोलला छाती ठोकून
शिवबा ला टाकतो चिरडून
कौतिक झाले दरबाराचे
खान निघला मोठ्या गुर्मीत

त्याच घोडदळ,पायदळ
फौजा फाटा लई बक्कळ
आंगी दहा हात्तिच बळ
पाहणारा कापे चळचळ

वाटेत भेटेल त्याला चिरड़ीत
ठेचीत खानची सेना निघाली
गाव लुटली देवळ उध्वस्त केली
आया बहिनींची आबरु लुटली

कोण?कोण रोखनार हे वादळ
आता शिवबाच काही खर नाही
ईकडे  निजाम,तिकडे मोगल
पालिकडे इंग्रज
जो तो हेच बोलू लागला

राजची सेना मुठभर
खानाला कसा थोपनार
काय लढवावा हुन्नर
चिंतेत पंत सरदार

अशा वाघिनिचा त्यो छावा…

अशा वाघिनिचा त्यो छावा,
गनिमाला कसा ठेचावा,
डोक्यात गनिमी कावा,
भेटीचा धाडला सांगावा,

प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान
हसत हसत कबूल केल
दिवस ठरला…
दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाण
प्रतापगडच्या पायथ्याशी खान…

प्रतापगडच्या पायथ्याशी खान,
हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान,
प्रतापगडच्या पायथ्याशी खान,
आला बेगुमान नाही त्याला जाण,

शिवाजी राजाच्या करामतीची,
शिवाजी राजाच्या करामतीची,
शिवाजी राजाच्या करामतीची,
अन, त्यास नाही जानीव शक्तीची,
त्यास नाही जानीव शक्तीची,
अन, करील काही कल्पना युक्तीची,
हा जी जी जी

खानाच्या भेटीसाठी
महाराजान एक शानदार शामियाना उभारला होत,

भेटीसाठी छान उभरिला
नक्षीदार शमियान्याला,

अन अश्या या शामियान्यत

खान डौलत डूलत आला
सैयद बंडा त्याच्या संगतिला
शिवबाच्या संगती महाला

राजाला पाहुन…राजाला पाहुन खान म्हणतो कसा
खान हाक मारितो हसरी
खान हाक मारितो हसरी,
रोखून नजरा गहीरी,
जी रा हा जी रा जी जी जी
जी रा हा जी रा जी जी जी

खानान राजाला आलिंगन दिल आणि दगा केला

खान दबी मान मान्याला
खान दबी मान मान्याला,
कट्यारीचा वार त्यानी केला
कट्यारीचा वार त्यानी केला,
खर खर आवाज झाला
खर खर आवाज झाला,
चिलखत व्हतय अंगाला
चिलखत व्हतय अंगाला,

खाना चा वार फुका गेला
खान येडबडला,
इतक्यात महाराजान
पोटामधी बिचूवा धकालला
पोटामधी बिचूवा धकालला,
वाघ नखांचा मारा केला
टरा टरा फाडल पोटाला
तडा गेला खानाचा कोथाळा
बाहीर आला जी जी जी
बाहीर आला जी जी जी
बाहीर आला जी जी जी शिवजयंती – पोवाडा । Song Credits

SingerNandesh Umap
MovieMi Shivajiraje Bhosale Boltoy
MusicAjit, Sameer and Atul
Music ProductionEverest Entertainment

Tags – शिवजयंती Songs.


Leave a comment